वडिलांकडून मुलीवर बलात्कार !
पुणे – अश्लील चित्रीकरणे दाखवून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या वडिलांना पोलिसांनी कह्यात घेतले. पीडित मुलीच्या शाळेत आयोजित केलेल्या ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रमात मुलीने याविषयी सांगितले. पीडित मुलगी वारजे येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. मुलीवर वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समाजसेविकेने मुख्याध्यापकांना दिल्यावर त्यांनी विश्वासात घेऊन मुलीची विचारपूस केली. वडील १ वर्षापासून बळजोरीने शारीरिक संबंध ठेवत असल्याची माहिती मुलीने दिली. तेव्हा वडिलांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.