शिक्षकाकडून तिसरीतील ५ मुलींचा विनयभंग !
अहिल्यानगर – जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खराडी जिल्हा परिषद शाळेत बाळशीराम बांबळे या शिक्षकानेच तिसरीतील मुलीशी गैरवर्तन केले. मुलीने दुपारच्या सुटीत घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी मुख्याध्याकांकडे तक्रार केली. मुख्याध्यापकांनी चौकशी केली, तेव्हा शिक्षकाने इतर ४ ते ५ मुलींशीपण असेच गैरवर्तन केले असल्याचे समजले. (असे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? – संपादक) पोलिसांनी या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिका :समाजाची नीतिमत्ता, नैतिकता रसातळाला गेल्याचे हे उदाहरण ! |