श्री तुळजाभवानीदेवीची गरुड वाहनातून छबिना मिरवणूक !
तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीदेवीची सकाळी ६ ते १० या वेळेत अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानीदेवीचे विविध धार्मिक विधी विधीवत् पूर्ण करण्यात आले. तत्पूर्वी रात्री ५ ऑक्टोबर या दिवशी तिसर्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्रालंकार चढवण्यात आले. त्यानंतर धूपारती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गरुड वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी प्रक्षाळ पूजा करण्यात आली. राज्यासह विविध राज्यांतून आलेले भाविक मोठ्या भक्तीभावाने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.