हिंदु धर्माची प्रवृत्ती आणि निवृत्ती ही २ अंगे परस्परांना साहाय्यक !
हिंदु धर्माची २ अंगे आहेत. १. प्रवृत्तीपर धर्म आणि२. निवृत्तीपर धर्म. ‘प्रवृत्तीपर धर्म’ हा प्रामुख्याने अभ्युदयाचा विचार सांगतो. अभ्युदय शब्दाने इहलोकीच्या, दृश्य जगताच्या क्षेत्रातील सुख-समृद्धी, समाधान यांचे विवेचन अभिप्रेत आहे. ‘निवृत्तीपर’ शब्दाचा अर्थ मुख्यतः ‘निःश्रेयसासाठी उपयोगी पडणारा’, असा आहे. नि:श्रेयस म्हणजे दृश्य जगताच्या पलिकडे असलेल्या परलोकातील आनंद वा मोक्षसुख. ही दोन्ही अंगे वेगवेगळी असली, तरी एकमेकांपासून तुटलेली अशी नसतात. ती काही प्रमाणात तरी परस्परांना साहाय्यक होतात.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘श्रीमनुस्मृती (सार्थ सभाष्य)’)