सातारा पोलिसांची अवैध फटाका विक्रेत्यांवर कारवाई !
सातारा, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – शहरांमध्ये माची पेठेत स्फोट झाल्यानंतर सातारा पोलीसदल सक्रीय झाले आहे. शाहूपुरी पोलिसांनी ४ ऑक्टोबर या दिवशी शहरातील अवैध फटाका विक्रेत्यांवर कारवाई केली, तसेच संबंधितांचे दुकानही ‘सील’ करत गुन्हा नोंद केला आहे. शहरातील स्फोट प्रकरणानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अवैध फटाका विक्रेते आणि मद्य विक्रेते यांच्यावर कारवाईच्या सूचना केल्या आहेत. (ही कारवाई योग्य असली, तरी स्फोट झालेल्या प्रकरणाचा सर्व तपशील पोलिसांनी जनतेसमोर उघड करणे आवश्यक ! – संपादक)