पंचवटी येथे साहाय्यक उपनिरीक्षकावर चाकूने आक्रमण !
पोलिसांचा धाक उरला नसल्यानेच त्यांच्यावर आक्रमणे होतात !
नाशिक – पंचवटी येथे गुन्हे शाखेत कार्यरत साहाय्यक उपनिरीक्षक नामदेव सोनवणे यांच्यावर चाकूने आक्रमण करण्यात आले; पण घायाळ अवस्थेत असतांनाही पोलीस अधिकार्याने पाठलाग करून गुन्हेगार गट्ट्या उपाख्य विकी जाधव याला कह्यात घेण्यात आले. त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.