‘हॉटेल शिदोरी’च्या माध्यमातून डोंबिवलीत पहिला ‘ओम प्रमाणित’ व्यवसाय चालू !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली चालू झालेल्‍या या चळवळीसाठी ‘ओम प्रतिष्‍ठान’ची स्‍थापना करण्‍यात आली आहे. असे असले, तरी हे प्रतिष्‍ठान सर्वत्रच्‍या हिंदूंसाठी आहे.  प्रसादातील साम्रगी पूर्णतः शुद्ध साम्रगी आहे कि नाही ?’, हे ‘ओम प्रमाणपत्र’ देण्‍यापूर्वी प्रथम पाहिले जाईल.

डोंबिवली – हिंदूंचे अस्तित्व आणि व्यवसाय यांच्या वृद्धीसाठी ‘ओम शुद्धता मानक प्रमाणपत्र’ देण्यात येते. डोंबिवलीतील पहिला आणि ठाणे जिल्ह्यातील दुसरा ‘ओम प्रमाणित’ व्यवसाय ‘हॉटेल शिदोरी’च्या माध्यमातून चालवला जात आहे. ‘हॉटेल शिदोरी’चे सर्वेसर्वा श्री. अद्वैत जोशी यांनी या प्रमाणपत्राची आवश्यकता ओळखली आणि ते या मोहिमेत सहभागी झाले. ते या मोहिमेत स्वयंसेवक म्हणूनही कार्यरत आहेत. ठाणे येथे ‘ओम प्रमाणित’ पहिला व्यवसाय देवेंद्र गंद्रे आणि रूपाली गंद्रे यांचा ‘हिमश्री ट्रेक्स अँड टूर्स’चा आहे.

सध्या सर्वत्र जाणूनबुजून अस्वच्छ खाद्यपदार्थ विकले जात आहेत. याच्या विरोधात ‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ या मोहिमेद्वारे कृतीशील पाऊल उचलण्यात आले. त्र्यंबकेश्वरमध्ये अशी १५० प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. गावोगावी, तसेच शहरांमध्येही चळवळ चालू झाली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ९८६९१२८५३६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.