अल्पवयीन मुलीवर बलात्कार !
२५ सहस्र रुपये खंडणी उकळली
नालासोपारा – सिमा मोर्या (वय २६ वर्षे) हिने तिच्या १३ वर्षांच्या मैत्रिणीची सोनू सहानी (वय २४ वर्षे) याच्याशी ओळख करून दिली. सोनूने विविध लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीची अश्लील छायाचित्रे सीमा हिला पाठवली. छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन सीमाने पीडितेकडून २५ सहस्र रुपये उकळले. पैशांची वाढती मागणी आणि सोनूचे अत्याचार यांना कंटाळून पीडितेने कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना कह्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. (अशांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! पालकांनीही त्यांच्या मुली कुणाशी मैत्री करत आहेत, याकडे लक्ष ठेवायला हवे ! – संपादक)