SarTanSeJuda In Maharashtra : अमरावती येथे ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देत धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण !
|
(सर तन से जुदा म्हणजे शिर धडापासून वेगळे करणे)
अमरावती – गाझियाबादच्या श्री डासनादेवी मंदिराच्या ठिकाणी ४ ऑक्टोबरला सहस्रो धर्मांध जमले होते. नवरात्रीनिमित्त मंदिरात जमलेल्या हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्याचा धर्मांधांचा प्रयत्न होता. (हिंदु समाज आणखी किती काळ धर्मांधांच्या दहशतीखाली वावरणार ? – संपादक) त्यामुळे त्यांनी मंदिराला चारही बाजूंनी घेरले होते. याचे लोण देशभरात पसरले. अमरावती येथे धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण केले. या वेळी ते ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’ (महंमद पैगंबर यांच्या अवमानाची एकच शिक्षा – शिर धडापासून वेगळे करणे) अशी घोषणा देत होते. त्यांनी रस्त्यावर दगडफेक चालू केली. यात ३० हून अधिक पोलीस कर्मचारी घायाळ झाले. जमाव नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. २२ हून अधिक पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. सध्या अमरावतीत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
🚨Attack on police by fanatics in Amravati while chanting #SarTanSeJuda slogans !
💥The terror caused by fanatics in #Ghaziabad is spreading to #Maharashtra
👉 The recurrence of the terror from #Ghaziabad to Maharashtra clearly indicates that this is a pre-planned conspiracy… pic.twitter.com/MBhNNcjTA6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 7, 2024
हे ही वाचा : संपादकीय : पुन्हा एकदा ‘सर तन से जुदा’च्या घोषणा ?
संपादकीय भूमिका
|