Sri Dasnadevi Temple Arrest : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे हिंदु नाव धारण करून काम करणार्या ३ मुसलमानांना अटक !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – रामलीलाच्या मंचावर हिंदु नाव धारण करून काम करणार्या ३ मुसलमान तरुणांना अटक करण्यात आली. हे तिघे जण गाझियाबादमधील श्री डासनादेवी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून हिंदु नावे असलेले आधारकर्ड आणि ओळखपत्रे जप्त केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
सौजन्य: Zee UP
श्री डासनादेवी मंदिराचा हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. महंत यति नरसिंहानंद गिरी यांच्या सुरक्षेचा विचार करून येथे नेहमीच पोलिसांचा फौजफाटा तैनात असतो. महंत यति नरसिंहानंद गिरी यांनी सांगितले की, विशिष्ट धर्माच्या लोकांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यामागे धार्मिक आणि सुरक्षेशी संबंधित कारणे आहेत.
संपादकीय भूमिकामुसलमानांवर हिंदु नाव धारण करण्याची वेळ का येते ? हिंदूंची फसवणूक करण्याचे त्यांचे षड्यंत्र यातून दिसून येते ! असले प्रकार रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत ! |