Bhopal Factory Drugs : भोपाळच्या कारखान्यातून १ सहस्र ८१४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील एका कारखान्यातून ‘एम्डी’ हे अमली पदार्थ आणि त्याचा कच्चा माल जप्त करण्यात आला. याची किंमत तब्बल १ सहस्र ८१४ कोटी रुपये आहे. गुजरात आतंकवादविरोधी पथक आणि देहली येथील अमली पदार्थ नियंत्रण विभाग यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. (मध्यप्रदेशातील पोलिसांना याची माहिती का मिळाली नाही ? त्यांचे या प्रकरणी काही साटेलोटे होते का ? याचाही शोध घेतला पाहिजे ! – संपादक)