2 million displaced from Lebanon to Syria : इस्रायलच्‍या आक्रमणांमुळे लेबनॉनमधून २० लाख लोकांचे सीरियामध्‍ये स्‍थलांतर

बेरूत (लेबनॉन) – इस्रायलच्‍या(Israel) सातत्‍याने होणार्‍या आक्रमणांमुळे लेबनॉनची(Lebanon) राजधानी बैरूतमधील लोक दहशतीत असून ते मोठ्या प्रमाणावर सीरियात(Syria) स्‍थलांतरित होत आहेत. आतापर्यंत सुमारे २० लाख नागरिकांनी सीरियात आश्रय घेतल्‍याची माहिती मिळते. इस्रायलने बैरूत-दमास्‍कस मार्गावर बाँबफेक करून हा मार्ग बंद केला आहे. त्‍यामुळे विस्‍थापित कुटुंबांना पायी सीरियात जावे लागत आहे आणि त्‍यात अडचणी येत आहेत.