Israel attacked mosque in Gaza : इस्रायलचे गाझामधील मशिदीवर आक्रमण !

हमासचे आतंकवादी मशिदीतून करत होते आतंकवादी कारवाया !

इस्रायलने केलेले गाझा पट्टीतील मशिदीवरील हवाई आक्रमण

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने(Israel) गाझा(Gaza) पट्टीतील मशिदीवर(mosque) हवाई आक्रमण केले. या आक्रमणात अनुमाने २४ जण ठार झाले असून ९३ जण घायाळ झाले आहेत. गाझा पट्टीतील दीर अल्-बलाहमध्ये (Deir al-Balah) अल्-अक्सा रुग्णालयाजवळील मशिदीवर हे आक्रमण झाले. या आक्रमणाविषयी इस्रायलने निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, दीर अल्-बलाह भागात ‘शुहादा अल्-अक्सा’ मशिदीत असलेल्या हमासच्या आतंकवाद्यांवर(terrorists) बिनचूक आक्रमण करण्यात आले. हे आतंकवादी या मशिदीतून कारवाया करत होते.

गाझातील धार्मिक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या आक्रमणात गाझातील १ सहस्र २४५ मशिदींपैकी ८१४ मशिदी नष्ट झाल्या आहेत, तर १४८ मशिदींची मोठी हानी झाली आहे. यासह ३ चर्चही नष्ट झाली आहेत. यासह ६० पैकी १९ स्मशानभूमींनाही लक्ष्य करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

हमासचेच नाहीत, तर जगभरातील आतंकवादी मशिदी, तसेच मदरसे येथून आतंकवादी कारवाया करतात. धर्मांध मुसलमान हिंदूंच्या मिरवणुकांवर मशिदींतूनच दगडफेक करतात. असे असले, तरी जगभरातील सर्वसामान्य मुसलमानांकडून याला कोणताही विरोध होत नाही, हे लक्षात घ्या !