Jani Master Rape case : बलात्काराचा आरोपी असणारा नृत्यदिग्दर्शक शेख जानी बाशा याला घोषित झालेला राष्ट्रीय पुरस्कार रहित
|
नवी देहली – सहकारी महिला नृत्यदिग्दर्शिकेचा ४ वर्षे लैंगिक शोषण करणारा नृत्यदिग्दर्शक शेख जानी बाशा उपाख्य जानी मास्टर याला घोषित करण्यात आलेला नृत्यदिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार रहित करण्यात आला आहे. तसेच त्याला या पुरस्कारच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार शाखेने या संदर्भात निवेदन प्रसारित केले आहे. जानी याला शोषणाच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने जानी याला या पुरस्कार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ६ ते १० ऑक्टोबरपर्यंत जामीन दिला आहे. वर्ष २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या दक्षिण भारतातील ‘तिरुचित्रंबलम्’ चित्रपटातील ‘मेघम करुकथा’ या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी जानी याला पुरस्कार घोषित करण्यात आला होता.
Accused of rape and forceful conversion for marriage, Tollywood choreographer Shaikh Jani Basha’s (Jani Master) National Award withdrawn.
Also banned from attending the event.
Is it ethically wrong if one demands a punishment according to Sharia to such lustful men?
PC :… pic.twitter.com/egRzLlibwd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 7, 2024
१. पीडित तरुणी वर्ष २०१९ मध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी पहिल्यांदा जानी याला भेटली होती. त्याने वाईट हेतून तिला साहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून नोकरी दिली.
२. वर्ष २०२० मध्ये जानीने मुंबईतील एका हॉटेलमध्ये पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. त्या वेळी पीडिता १६ वर्षांची होती. यानंतर पुढील ४ वर्षांत जानी याने पीडितेचे अनेक वेळा लैंगिक शोषण केले.
३. तक्रार केल्यानंतर जानी याने पीडितेला, ‘तुला काम मिळू देणार नाही’, अशी धमकी दिली. स्वतःच्या संपर्काचा वापर करून त्याने पीडितेला चित्रपटात संधी मिळण्यापासूनही रोखले.
४. जानी आणि त्याची पत्नी हे पीडितेच्या घरी गेले आणि तिला मारहाण करत धर्म पालटून विवाह करण्यासाठी दबाव टाकला.
५. लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर जानी याला ‘तेलुगु फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स’मधून निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच कामगार संघटनेतूनही काढून टाकण्यात आले.
६. जानी याचे जुने मित्र असणारे अभिनेते, तसेच आंध्रप्रदेशाचे विद्यमान उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही जानी याला पक्षाच्या कार्यापासून दूर रहाण्याचा आदेश दिला. जानी याने मागील निवडणुकीत पवन कल्याण यांच्या पक्षाचा प्रचार केला होता.
संपादकीय भूमिका
|