Bangladesh Army Chief On Durga Puja : दुर्गापूजेपूर्वी हिंदूंना पूर्ण सुरक्षा देऊ !
बांगलादेशाचे सैन्यदलप्रमुख वकार-उझ-झमान यांचे आश्वासन
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाचे सैन्यदलप्रमुख वकार-उझ-झमान यांनी हिंदु समुदायाला दुर्गापूजेपूर्वी सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले. ढाकेश्वरी मंदिरातील दुर्गापूजा सोहळ्यासाठी सुरक्षा उपायांचा आढावा घेण्यासाठी ढाका येथे आलेले झमान यांनी सर्व हिंदूंना शुभेच्छा दिल्या. झमान यांनी मेट्रोपॉलिटन पूजा समिती आणि बांगलादेश पूजा सेलिब्रेशन कौन्सिल यांच्या अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकार्यांशी चर्चा केली. ते म्हणाले, अंतरिम सरकारच्या सूचनेनुसार प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेसाठी देशभरातील जिल्ह्यांमध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहे.
The Hindus will be given full protection before the Durga Puja. – Bangladesh Army Chief Waker-uz-Zaman.
👉 There are ongoing attacks on #HindusInBangladesh as their army chief speaks.
In that case, is the Chief’s assurance really trustworthy?#HindusUnderAttack… pic.twitter.com/8W19hGngf4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 6, 2024
संपादकीय भूमिकाबांगलादेशात अद्यापही हिंदूंवर आक्रमणे चालू असतांना अशा प्रकारची खोटी आश्वासने देणार्या बांगलादेशाच्या सैन्यदलप्रमुखांवर कोण विश्वास ठेवणार ? |