भायखळा येथे अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची हत्या
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) भायखळा विधानसभा मतदारसंघाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी तथा मुन्ना (वय ४५ वर्षे) यांची ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री हत्या करण्यात आली.
भायखळा येथील रेतीवाला इंटस्ट्रीज समोरील अनंत पवार मार्गावर कुर्मी घायाळ अवस्थेत पडलेले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन त्यांनी कुर्मी यांना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी नेले; मात्र आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या शरिरावर धारदार शस्त्राचे वार दिसत होते.