वैजापूर येथे प्रकल्प अधिकारी आणि शिपाई यांना लाच घेतांना अटक !
भ्रष्टाचाराने पोखरलेला महसूल विभाग !
वैजापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – शासन आदेशानुसार साहाय्यक पदावर कार्यरत; परंतु अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागेवर पदोन्नती मिळालेल्या ३ साहाय्यक यांच्याकडून ४० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना वैजापूर पंचायत समिती कार्यालयातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल चव्हाण आणि शिपाई अनंत बुट्टे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ ऑक्टाेबर या दिवशी पकडून अटक केली.
अंगणवाडीसेविका या पदावर पदोन्नतीने स्थानिक अंगणवाडीच्या पात्र साहाय्यनीस यांना नियुक्तीचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार वैजापूर तालुक्यातील १८ साहाय्यकांना पदोन्नती झाली आहे. त्यानुसार आचारसंहिता लागण्याच्या आधी बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सबंधित साहाय्यकांना आदेश देणे बंधनकारक होते; परंतु आदेश काढण्यासाठी वैजापूर बालविकास प्रकल्प अधिकारी चव्हाण यांनी कार्यालयातील शिपाई अनंत बुट्टे यांच्या माध्यमातून निवड झालेल्या साहाय्यकांकडे पैशांची मागणी केली होती.
संपादकीय भूमिका :भरघोस वेतन असतांना लाच घेणारे असे अधिकारी आणि शिपाई यांना कठोर शिक्षा केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही ! |