Bengal Minor Rape N Murder : बंगालमध्ये ९ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या – गावकर्यांनी पोलीस चौकी पेटवली !
पोलिसांनी तक्रारीकडे गांभीर्याने न पाहिल्याने गावकर्यांचे टोकाचे पाऊल !
दक्षिण २४ परगणा (बंगाल) – दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कृपाखाली गावामध्ये एका ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेनंतर संतप्त गावकर्यांनी महिस्मरी पोलीस चौकी पेटवून दिली.
The rape and murder of a 9-year-old girl shocks #South24Paraganas (#Bengal)
▫️Infuriated public sets the Police Station on fire.
▫️The disinterest showed by the Police while registering the complaint, made the people take an extreme measure.
👉 Bengal has reached the abyss… pic.twitter.com/aKP0LmXtTY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 5, 2024
१. मुलगी ४ ऑक्टोबरला दुपारी शिकवणी वर्गाला गेली होती. ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिचा शोध चालू केला; मात्र ती न सापडल्याने त्यांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार केली. यावर स्थानिक पोलिसांनी त्यांना दुसर्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले. त्याच रात्री गावाजवळील तलावात मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
२. ५ ऑक्टोबरला सकाळी गावकर्यांनी स्थानिक पोलीस चौकीला घेराव घातला. या वेळी तेथे उपविभागीय पोलीस अधिकारी आतिश बिस्वास उपस्थित होते. गावकर्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यांनी पोलीस अधिकार्यांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. एका पोलीस अधिकार्याने सांगितले की, लोकांनी पोलीस चौकीच्या बाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड केली. पोलीस लोकांचा संताप पाहून पोलीस चौकी सोडून पळून गेले. यानंतर परिसरात पोलीस फौजफाटा पाठवण्यात आला. यानंतर पोलिसांनी गावकर्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या वेळी ग्रावकर्यांनी पोलीस चौकीची तोडफोड करून ती पेटवून दिली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
३. आमच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन चालूच ठेवणार आहोत, असे लोकांनी सांगितले. कारवाई करण्यास दिरंगाई करणार्या पोलीस अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी तातडीने कारवाई केली असती, तर मुलीला वाचवता आले असते, असे लोकांचे म्हणणे आहे.
४. स्थानिक आमदार गणेश मंडल यांनी गावकर्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता गावकर्यांनी त्यांना पळवून लावले. मंडल यांनी नंतर प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांना लोकांचा रोष समजला आहे; मात्र त्यांनी कायदा हातात घेऊ नये.
५. पोलिसांनी बलात्काराच्या घटनेवर सांगितले की, आम्ही आरोपीला ओळखले आहे आणि त्याला अटक केली आहे. त्याने गुन्हा केल्याची स्वीकृतीही दिली आहे. गुन्ह्याची माहिती मिळताच आम्ही तत्परतेने कारवाई केली. तरीही लोकांचे आरोप असतील, तर आम्ही त्याकडेही नक्कीच लक्ष घालू.
६. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सुकांतो मजुमदार यांनी टीका करतांना म्हटले की, घरातील दुर्गा सुरक्षित नसेल, तर कोणत्या दुर्गेची पूजा करावी ? हे सर्व ममता बॅनर्जी यांच्यामुळेच होत आहे. बॅनर्जी यांनी एक संदेश पसरवला आहे की, ‘पोलिसांनी सहजपणे गुन्हा नोंदवू नये !’
संपादकीय भूमिकाकायदा आणि सुव्यवस्थेने रसातळ गाठलेला बंगाल ! याविषयी तथाकथित राज्यघटनाप्रेमी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! |