Sri Lankan President Dissanayake : श्रीलंकेची भूमी भारताविरुद्ध वापरू देणार नाही !
श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांचे भारताला आश्वासन
कोलंबो (श्रीलंका) – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी श्रीलंकेचे नवनियुक्त राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली. या बैठकीत ‘समृद्ध श्रीलंकेचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारताचे आर्थिक पाठबळ महत्त्वाचे आहे. ‘भारताचे हित लक्षात घेऊन श्रीलंकेचा भूभाग भारतविरोधी कारवायांसाठी वापरण्याची अनुमती कुणालाही दिली जाणार नाही’, असे राष्ट्रपती दिसानायके यांनी म्हटले आहे. या वेळी भारताने श्रीलंकेला तिच्या अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी सतत पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. ‘द्विपक्षीय कर्ज पुनर्रचनेविषयी भारत श्रीलंकेसमवेत सामंजस्य करार करेल आणि खासगी बाँडधारक कर्ज पुनर्रचना कराराला पाठिंबा देईल’, असे आश्वासनही त्यांनी दिले.
India-Sri Lanka Relations: Sri Lankan President Anura Kumara Dissanayake assures India: “No Sri Lankan land will be used against India.”
But should India trust this statement?
Dissanayake’s pro-China stance and anti-India leanings raise concerns.
It would be wise for India to… pic.twitter.com/ulWDqoTsoK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 5, 2024
संपादकीय भूमिकादिसानायके हे चीनधार्जिणे आणि भारतद्वेषी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर कितपत विश्वास ठेवायचा ? भारताने श्रीलंकेच्या संदर्भात सतर्क रहाणेच योग्य ठरणार आहे ! |