Israel Hezbollah War : इस्रायलच्या आक्रमणात लेबनॉनमध्ये २ सहस्रांहून अधिक ठार
तेल अविव – लेबनॉनमध्ये इस्रायली आक्रमणांमध्ये आतापर्यंत २ सहस्रांहून अधिक लोक मारले गेले आहेत. इस्रायलच्या सततच्या हवाई आक्रमणांमुळे १० लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. ‘बेरूतमधील हिजबुल्लाचे कमांड सेंटर उद़्ध्वस्त करण्यात आले आहे’, अशी माहिती इस्रायली सैन्यदलाच्या सूत्रांनी दिली. कमांड सेंटर’ म्हणजे माहितीची देवाणघेवाण अथवा दळणवळण यांसाठी उभारण्यात आलेले मुख्य केंद्र होय.
Israel Hezbollah War :
Death toll crosses 2000 as Israel continues attack on Lebanon#Israel‘s constant airstrikes have left over a million people homeless#Hezbollah Headquarters decimated#IsraelLebanonWarpic.twitter.com/hyMc9a6qsJ— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 5, 2024
लेबनॉनमधून इस्रायलवर रॉकेट आक्रमण !
लेबनॉनमधून इस्रायलवर रॉकेटद्वारे आक्रमण केले आहे. या आक्रमणात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. बहुतांश रॉकेट इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केले.