जळगाव येथे रॅगिंग प्रकरणी ३ विद्यार्थ्यांना क्लीन चिट !
जळगाव – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या रॅगिंग प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून ३ विद्यार्थ्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील स्त्रीरोग अन् प्रसुतीशास्त्र विभागातील आशा, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह सहप्राध्यापक यांचे जबाब नोंदवण्यात आले होते. त्यातून रॅगिंग झाल्याचे निष्पन्न झाले नाही. तक्रारदार तसा ठोस पुरावा देऊ शकले नाहीत.