राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांना मंत्रीपदाचा दर्जा !
मुंबई – राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी १६ सप्टेंबर २०२४ या दिवशी राज्यशासनाच्या वतीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. ४ ऑक्टोबर या दिवशी शासन आदेश काढून राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या अडसूळ यांना राज्यशासनाकडून मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.