श्री महालक्ष्मीदेवीची गजेंद्रलक्ष्मी स्वरूपात पूजा !
कोल्हापूर – श्री महालक्ष्मीदेवीची दुसर्या दिवशी (अश्विन शुद्ध द्वितीया) गजेंद्रलक्ष्मी स्वरूपात पूजा बांधण्यात आली होती. देव आणि असुर यांच्या समुद्रमंथनातून जी १४ रत्ने निघाली, त्यात पहिली लक्ष्मी निघाली. तिला कमलालक्ष्मीसुद्धा म्हणतात. हिला गजेंद्रलक्ष्मी अथवा गजलक्ष्मी म्हणण्याचे कारण की, ही जेव्हा समुद्रमंथनातून उत्पन्न झाली, तेव्हा तिला हत्तींनी अमृतकुंभाने अभिषेक केला. ही दुर्भाग्याचा नाश करून सर्व सौभाग्य देणारी देवता आहे. तिच्या उपासनेने जगात धन आणि समृद्धी लाभते. ऐश्वर्याच्या परमावधीचे प्रतीक म्हणून या देवीची उपासना करतात. ही पूजा श्रीपूजक विद्याधर मुनीश्वर, अरुण मुनीश्वर आणि मयूर मुकुंद मुनीश्वर यांनी बांधली होती.