‘मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रे’चे श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात स्वागत !
कोल्हापूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना ‘धर्मवीर आध्यात्मिक सेना’ प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रे’चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते सहस्रो साधूसंतांच्या उपस्थितीत कोल्हापुरातून झाला. या पार्श्वभूमीवर धर्मजागरण यात्रेचे हिंदुत्वनिष्ठांकडून श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी ह.भ.प. अक्षय महाराज भोसले म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कट्टर शिवभक्त असून छत्रपतींच्या विचारांना पुढे घेऊन जात महाराष्ट्र हितासाठी आठवड्यातील ७ ही दिवस २४ घंटे कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास आध्यात्मिक क्षेत्रातील २५० हून अधिक स्वयंसेवक पूर्णवेळ सक्रीय राहून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या सर्व गोष्टी पोचवणार आहेत.’’
या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. कुंदन पाटील, अखिल भारत हिंदु महासभा जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासने, शिवसेनेचे श्री. अर्जुन आंबी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह अन्य उपस्थित होते.