शिधापत्रिका धारकांसाठी ‘ई-केवायसी’ नोंदीला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ !

ई-केवायसी – म्हणजे ग्राहकांची ओळख आणि पत्ता यांविषयी सत्यता पडताळून घेणे. ऑनलाईन पद्धतीने ही सत्यता पडताळण्याला ‘ई-केवायसी’ म्हणतात.

सातारा, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – शिधापत्रिका धारकांसाठी ई-केवायसी नोंदीची मुदत काही वृत्तपत्रांमध्ये ३० सप्टेंबर २०२४ अशी आल्यामुळे शिधापत्रिका धारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा दिनांक ३१ ऑक्टोबर करण्यात आला आहे. ज्या शिधापत्रिका धारकांचे ई-केवायसी करण्याचे राहिले आहे, त्यांनी ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आपल्या शिधापत्रिका वाटप दुकानांमध्ये जाऊन ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन ‘रेशन दुकानदार संघटने’चे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी केले आहे.