उल्हासनगर येथे वेश्या व्यवसायासाठी भाग पाडलेल्या १५ महिलांची सुटका
ठाणे, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – उल्हासनगर येथील ‘सितारा लॉजिंग अँड बोर्डींग’मध्ये विदेशी महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार धाड घालून पोलिसांनी लॉजचे व्यवस्थापक पंकज सिंह याच्यासह ५ जणांना कह्यात घेतले आहे. वेश्या व्यवसायासाठी भाग पाडण्यात आलेल्या थायलंड येथील १५ महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख २७ सहस्र रुपयांची रोकड आणि साहित्य जप्त केले आहे.