India’s warships In  Abbas port : भारताच्‍या तीन युद्धनौका इराणच्‍या अब्‍बास बंदरात दाखल !

नवी देहली –  इस्रायल कोणत्‍याही क्षणी इराणवर आक्रमण करण्‍याची शक्‍यता आहे. असे असतांना भारताने ३ युद्धानौका इराणच्‍या अब्‍बास बंदरात पाठवल्‍याने सर्वांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत. भारतीय नौदलाच्‍या युद्धनौका अब्‍बास बंदरात दाखल झाल्‍या आहेत. इराणच्‍या सैन्‍यासोबत या युद्धनौका खाडीत युद्धसराव करणार आहेत, असे भारतीय नौदलाच्‍या अधिकार्‍याने सांगितले.

सौजन्य:Jagaran

इराणने भारतीय युद्धनौकांचे अब्‍बास बंदरावर स्‍वागत केले. भारत आणि इराण यांचे लक्ष समुद्री सहयोगावर असल्‍याचे या वेळी सांगण्‍यात आले. मार्चमध्‍ये इराणच्‍या २ प्रशिक्षण नौका मुंबईत आल्‍या होत्‍या. तसेच फेब्रुवारीमध्‍ये इराणी नौदलाची युद्धनौका भारताच्‍या नौदल सरावात सहभागी झाली होती.