SC On #TirupatiLaddu : सर्वोच्च न्यायालयाकडून नव्याने अन्वेषण करण्यासाठी ५ सदस्य समितीची स्थापना करण्याचे निर्देश
तिरुपती मंदिराच्या लाडूंचे प्रकरण
नवी देहली – तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये गोमांसाच्या चरबीपासून बनवलेले तूप वापरण्यात आल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नव्याने अन्वेषण करण्याचे, तसेच चौकशीसाठी ५ सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
#TirupatiLaddu Prasadam issue : Supreme Court orders fresh investigation, forms 5-member Special Investigation Team (SIT)
A new five-member SIT will have officers of the CBI, Andhra Pradesh Police and the FSSAI#FreeHinduTemples #ReclaimTemplespic.twitter.com/YvlcVqjWOH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 4, 2024
यामध्ये २ सदस्य सीबीआयचे, २ सदस्य आंध्रप्रदेश पोलिसांचे, तर एक सदस्य भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.