Pawan Kalyan On Laddu Issue : तिरुपती लाडूतील भेसळ हे सनातन धर्मावर आक्रमण ! – आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण
तिरुपती – तिरुपती लाडू बनवण्यासाठी गोमांसापासून बनवण्यात आलेले तूप वापरण्यात येत होते. ही भेसळ म्हणजे सनातन धर्मावरील आक्रमण आहे, असे कठोर वक्तव्य आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी येथे केले. मागील सरकारच्या काळात जी अनेक प्रकरणे आणि घोटाळे घडले, त्यांपैकी हे प्रकरण म्हणजे हिमनगाचे टोक आहे. मागील सरकारचे असे अनेक निर्णय आहेत, ज्यांचे अन्वेषण होणे शेष आहे. तिरुपती मंदिराला भेट दिल्यानंतर पवन कल्याण एका जाहीर सभेत बोलत होते.
Adulteration of Tirupati Laddu is an attack on Sanatan Dharma ! – Andhra Pradesh Deputy Chief Minister Pawan Kalyan
Pawan Kalyan condemns Tamil Nadu Deputy Chief minister Udhayanidhi Stalin’s past remarks over #SanatanaDharma#TirupatiLadduRow #Hinduspic.twitter.com/4fsxMRpHF3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 4, 2024
हिंदुद्वेषी उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर साधला निशाणा !
उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या अश्लाघ्य वक्तव्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘जर कुणी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर मी भगवान बालाजीच्या चरणी नतमस्तक होऊन मी हे सांगतो की, असे म्हणणार्यांचाच नाश होईल. सनातन धर्माच्या रक्षणासाठी देशात कायदा करण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्म रक्षक मंडळाची स्थापना झाली पाहिजे आणि त्याला देश आणि राज्य पातळीवर पुरेसा निधी उपलब्ध झाला पाहिजे. मी सनातनी हिंदु आहे आणि हिंदु धर्मासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची माझी सिद्धता आहे. तुमच्यासारखे (उदयनिधी स्टॅलिनसारखे) लोक येतील आणि जातील; पण सनातन धर्म कायम राहील.’’
तिरुपती मंदिरातील प्रसादम्मध्ये (लाडूमध्ये) गोमांसापासून बनवण्यात आलेल ेतूप वापरल्यानंतर उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची ११ दिवस उपवास करून प्रायश्चित्त घेतले. त्यानंतर त्यांनी तिरुपती मंदिराला भेट दिली.