पुणे येथील चतु:श्रृंगी मंदिरात नवरात्रोत्सवात महनीय व्यक्तींसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार !
पुणे – येथील प्रसिद्ध चतु:श्रृंगी मंदिरात नवरात्रोत्सवामध्ये महनीय व्यक्तींसाठी दर्शन बंद ठेवणार असल्याचे मंदिर विश्वस्तांनी घोषित केले. नवरात्रोत्सवात भाविकांसाठी मंदिर २४ घंटे चालू रहाणार आहे. २ कोटी रुपये खर्च करून या वर्षी मंदिराच्या जीर्णोद्धाराचेही काम झाले आहे. उर्वरित बांधकाम आणि परिसराचे सुशोभीकरण पुढील काही महिन्यांत पूर्ण होईल. नवरात्रोत्सवात १० लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील, असा विश्वास मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अमित अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त श्रीकांत अनगळ यांनी व्यक्त केला. मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या यात्रेसह पूर्ण वर्षाचा २ कोटी रुपयांचा विमा काढला असल्याची माहितीही त्यांनी दिली.