नवरात्रीच्या कालावधीत झालेल्या दशमहाविद्या यागांच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘नवरात्रोत्सवानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १५ ते २४.१०.२०२३ या कालावधीत दशमहाविद्या याग करण्यात आले. त्या कालावधीत साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘नवरात्रीमध्ये यागाच्या वेळी मला शांतीची अनुभूती येत होती. मला ‘त्या स्थितीतून बाहेर येऊच नये’, असे वाटत होते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
अ. श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी सांगत असतांना ‘देवी आश्रमात राहून आम्हा सर्वांचा उद्धार करत आहे’, असे मला वाटत होते. मला त्या संदर्भातील दिव्य अनुभूती हृदयामध्ये जाणवत होती.
आ. ‘मी वेगळ्याच विश्वात आहे’, असे मला जाणवत होते.
इ. मला प्रचंड चैतन्य जाणवत होते.’
– सौ. आशा होनमोरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |