व्यायाम, म्हणजे नैराश्य घालवणारी संजीवनी !
निरोगी जीवनासाठी व्यायाम ! – भाग १५
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/839821.html
‘नैराश्य आणि उदासीनता घालवण्यासाठी व्यायाम अत्यंत प्रभावी असल्याचे संशोधनातून आढळून आले आहे. व्यायामामुळे मनाची स्थिती सुधारणारी आणि भावनांचे नियमन करणारी मेंदूतील विविध न्यूरोकेमिकल्स (मज्जासंस्थेशी संबंधित रसायने) स्रवण्यास (secrete करण्यास) शरीर प्रवृत्त होते, उदा. ‘सेरोटोनिन’ हे सर्व स्तरांवरील कल्याणाच्या (well being च्या) भावनांशी संबंधित आहे, तर ‘डोपामाइन’चा संबंध पुरस्कार (reward) आणि आनंद यांच्याशी आहे.
व्यायाम करतांना ही रसायने स्रवल्याने (secrete झाल्याने) नकारात्मक विचार आणि चिंता न्यून होऊन उत्साह, आनंद अन् आत्मविश्वास वाढतो, तसेच झोपेची घडी बसण्यासही साहाय्य होते. व्यायामामुळे मनावर होणार्या अशा सर्वांगीण सकारात्मक परिणामांमुळेच त्याला सर्वोत्तम ‘अँटीडिप्रेसंट (निराशा दूर करणारी संजीवनी)’, असे म्हटले आहे.’
– श्री. निमिष त्रिभुवन म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (८.९.२०२४)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise