लवकरच न्यायालयात आरोपपत्र सादर होणार !
वरळी येथे महिलेला फरफटत नेल्याचे अपघात प्रकरण
मुंबई – वरळी सी फेस परिसरात कावेरी नाखवा यांच्या अपघात प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण होत आले असून पोलीस ७०० हून अधिक पानांचे आरोपपत्र न्यायालयात एक-दोन दिवसांत सादर करणार आहेत. आतापर्यंत ३८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असली, तरी या प्रकरणी एका प्रत्यक्षदर्शी टॅक्सीचालकाची महत्त्वाची साक्ष नोंदवण्यात येणार आहे.
आरोपी राजऋषी बिडावत आणि मिहीर शहा या दोघांच्याही वैद्यकीय तपासणीत दारूचा अंश सापडला नाही. त्याचा अहवालही नकारात्मक आला आहे; मात्र जुहू येथे मद्यपान केल्यानंतर मिहीर शहाने मालाड येथील साईनाथ बारमधून बिअरचे ४ कॅन खरेदी केल्याचा जबाब वेटरने दिला आहे.