लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता दिवाळीपूर्वीच मिळणार !
मुंबई – मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीपूर्वीच बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. नोव्हेंबरमध्ये दिवाळी असल्याने त्याआधीच पैसे जमा करून लाडक्या बहिणींना भाऊबिजेची भेट मिळणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेत बोलतांना दिली.