रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या भुवनेश्वरी यागाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना पू. रमेश गडकरी यांना आलेल्या अनुभूती
‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०२३ मधील नवरात्री उत्सवाच्या कालावधीत दशमहाविद्या याग झाले. देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील साधक आणि संत यांना या यागांचे संगणकीय प्रक्षेपण पहाता आले. भुवनेश्वरी याग होत असतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘यज्ञातील ज्वाळा यज्ञकुंडातून वर येऊन हविर्भाग ग्रहण करत आहेत’, असे मला जाणवले.
२. मी यागाचे संगणकीय प्रक्षेपण पहात असूनही मला यागातील धुराचा सुगंध येत होता.
३. यज्ञात आहुती देतांना डोळ्यांना धूर लागून जसे डोळे चुरचुरतात, तसे माझे डोळे चुरचुरत होते.
४. यज्ञातील आहुतीच्या शेवटच्या आवर्तनाच्या वेळी यज्ञातून धुरकट रंगाच्या धुराऐवजी काळा धूर येऊ लागला. तेव्हा ‘अनिष्ट शक्ती जळून नष्ट होत आहेत’, असे मला वाटले.
गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– (पू.) श्री. रमेश गडकरी (वय ६६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.१०.२०२३)
|