जिहाद संपवा !
नवरात्रोत्सव विशेष
‘जय शुम्भनिशुम्भकपालधरे प्रणमामि तु देवी नरार्तिहरे ॥’
– वेदव्यासरचित ‘भगवतीस्तोत्र’
अर्थ : शुंभ आणि निशुंभ या असुरांची मुंडकी धारण करणार्या आणि मानवाचे दुःख हरण करणार्या हे देवी तुला नमन असो.
छत्रपती संभाजीनगर येथील निराला बाजार परिसरात नवरात्रीनिमित्त गरब्याच्या शिकवणीवर्गाचे विज्ञापन समाजमाध्यमांवर ‘असलम खान’ या व्यक्तीच्या खात्यावरून प्रसिद्ध करण्यात आले. इतके दिवस मुसलमान युवक गरब्यासारख्या कार्यक्रमात जाऊन हिंदु युवतींना जाळ्यात ओढत, आता गरबा शिकवण्याच्याच नावाखाली ‘लव्ह जिहाद’चा ‘छुपा अजेंडा (धोरण)’ राबवत आहेत. गरबा शिकण्याच्या नावाखाली हिंदु युवती इथे येणार आणि धर्मांध त्यांचा अपलाभ उठवणार, हे उघड आहे. शिकवणारा मुसलमान असल्याने मुसलमान युवकांना मुक्तपणे प्रवेश मिळणार अन् त्यातून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे सहज शक्य होणार. अशा प्रकारे मुसलमानांकडून चालवण्यात येणारी नृत्य केंद्रे म्हणजे लव्ह जिहादी कारवायांचा अड्डाच बनणार हे निश्चित ! भक्तीच्या उत्सवाचे वातावरण जिहादने बिघडवण्याचा प्रयत्न थांबवण्यासाठी हिंदु भगिनींना आता विरांगना होण्याविना पर्याय नाही !
लव्ह जिहादमुळे आतापर्यंत लक्षावधी तरुणींच्या आयुष्याची वाताहात झाली आहे. अनेक मुलींच्या देहाचे तुकडे झाले आहेत. ‘माझा अब्दुल तसा नाही’, याची पुनरावृत्ती आता थांबायलाच हवी ! मराठे, राजपूत, जाट, आसामी वीर आणि विरांगना यांनी जिहाद्यांना तलवारीचे पाणी पाजत जो पराक्रम वेळोवेळी दाखवला, त्या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण युवतींनी केल्यास त्या कधीही या जिहाद्यांच्या कचाट्यात सापडून त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करून घेणार नाहीत ! मात्र दुर्दैवाने हिंदु युवती मोगलांच्या काळ्या इतिहासापासून दूर असल्याने त्या ‘लव्ह जिहाद’च्या विविध क्लृप्त्यांमध्ये फसत आहेत. ७ व्या शतकातील सिंधच्या राजा दाहिरची पत्नी आणि मुली यांनीही मातृभूमी अन् अस्मितारक्षण यांसाठी बलीदान दिले. सिंधचे दिवाण गुंडुमल यांच्या कन्येने शीर धडावेगळे करून घेण्याचे मान्य केले; परंतु मीर कासिमची पत्नी होण्याचे नाही ! मुसलमान आक्रमकांशी लढणार्या या विरांगनांच्या आदर्शांची आज उजळणी करण्याची वेळ आली आहे. कावेबाज धर्मांधांच्या कोणत्याही युक्त्यांमध्ये न फसता दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचे प्रतिपालन करणार्या देवतेला शरण जाण्याचा काळ आता आला आहे. हा नवरात्रोत्सव युवतींनी त्यांना असुरक्षित करणार्या आसुरी प्रवृत्तींचे निर्दालन करणारे शक्तीतत्त्व जागृत करण्यासाठीच साजरा करावा !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे