पुणे येथे पुजार्‍यासह ७ शिष्यांचे अपहरण

५ कोटी रुपये खंडणीची मागणी

प्रतिकात्मक चित्र

पुणे – धार्मिक कार्यासाठी कर्नाटक येथे नेण्याच्या निमित्ताने पुजार्‍यासह ७ शिष्यांचे अपहरण करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी रामू वळून, दत्ता करे, हर्षद पाटील यांना अटक केली आहे. आरोपींना बिबवेवाडी आणि कर्नाटक पोलिसांच्या पथकाने रायचूर, कर्नाटक येथून अटक केली. या प्रकरणी पुजारी लांडे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

बजरंग लांडे हे पुजारी आहेत. २९ जुलै या दिवशी त्यांचा मुलगा स्वप्नील याला आरोपी घरी येऊन भेटले. विजापूरमध्ये हर्षद पाटील यांच्या घरी पूजा आणि मूर्ती प्रतिष्ठापना करायची आहे, असे सांगितले. त्यासाठी लांडे आणि त्यांचे ७ शिष्य विजापूर येथे गेले, तेव्हा त्या सर्वांना एका खोलीत डांबून ठेवण्यात आले अन् त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली.

संपादकीय भूमिका :

अशांना कठोर शिक्षा दिल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !