आई अंबे, आम्हावर अखंड कृपाछत्र धरी ।
३.१०.२०२४ या दिवसापासून चालू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सौ. तेजा म्हार्दाेळकर यांना सूचलेले काव्य येथे देत आहोत.
अंबे, माझे आई, जागी तू होई । नतमस्तक होते तव चरणांच्या ठायी ।
देश अन् धर्म यांचे रक्षण करण्या जागी तू होई । जागी तू होई दुर्गे, जागी तू होई ।। १ ।।
चरणतळा तुझ्या घेई काम, क्रोध अन् मत्सर, मोह, माया यांना नको देऊ थारा ।
आत्मज्ञान देशी आई, तुझ्या या लेकरा । आई अंबे, आम्हावर अखंड कृपाछत्र धरी ।। २ ।।
जगदंबा तू जगत्तारिणी, चंड-मुंड तू संहारिणी । विश्वाची चालक आई, मायेची साऊली ।
आनंदे ही नित्य खुलु दे पतीत पावन धरा । जागी तू होई आई, जागी तू होई ।। ३ ।।
कल्याणमयी, करुणामयी सकलांची तू आई । सकल जनांच्या मना स्थैर्य तूची देई ।
अहंभाव हा दूर सारूनी नतमस्तक करून घे आई । जागी हो आई, अंबे, जागी हो आई ।। ४ ।।
आई, तुजवाचून आम्हा कोण गे त्राती । तूच दात्री, तूच माता पाव गे आता ।
अखंड भारत पुन्हा स्थापण्या जागी हो आई । जागी हो आई अंबे, जागी हो आई ।। ५ ।।
– सौ. तेजा मनोज म्हार्दाेळकर, मडकई, गोवा. (२१.१०.२०२३)