सर्वधर्मसमभाव म्हणून शाळेत ईद साजरी केल्याचे हुजूरपागेचे स्पष्टीकरण
पुणे – हुजूरपागा शाळेत ‘ईद-ए-मिलाद’ साजरी करण्यात आल्याने सर्वत्र गदारोळ चालू आहे. सण-उत्सव आणि उपक्रम साजरे होतांना कोणत्याही धर्माचे शिक्षण, प्रसार किंवा भलावण केली जात नाही, तर त्याग, प्रेम, समता, बंधुभाव अन् आत्मविश्वास ही मूल्ये विद्यार्थिनींच्या मनामध्ये रुजवली जातात. हा मूल्यशिक्षणाचा भाग असतो. त्यामुळे सामाजिक माध्यमांवरील गदारोळ अनाठायी असून संस्थेची अपकीर्ती करण्याच्या उद्देशाने हेतूपुरस्सर निर्माण केला गेला असल्याचे संस्थेच्या सचिव रेखा पळशीकर यांनी स्पष्ट केले. (आधी अयोग्य कृती करायची आणि आवाज उठवल्यावर अपकीर्ती म्हणायची, ही मानसिकता चुकीची आहे. – संपादक) सर्वधर्मसमभाव-सहिष्णुतेची परंपरा संस्था पुढे नेत असल्याची माहिती संस्थेने दिली.
संपादकीय भूमिकाशिक्षणतज्ञ आणि क्रांतीकारक यांनी नावारूपाला आणलेल्या या शाळेने भारतीय संस्कृती जपण्याचे आणि जोपासण्याचे कार्य केले आहे. कधी काळी संस्कार घडवणारी ही शाळा आज मात्र बेगडी सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदुत्वावरच घाला घालत मुलींचीही लव्ह जिहादच्या दृष्टीने मानसिकता घडवण्याचा प्रयत्न करत आहे. याला वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे ! |