बालकाच्या अपहरणाच्या प्रकरणी २ धर्मांधांना कर्णावतीतून अटक !
पुणे – रेल्वेस्थानकाच्या आवारातून ७ महिन्यांच्या बालकाचे अपहरण केल्याप्रकरणी लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी अन्वेषण करून महंमद कुरेशी आणि नजमा कुरेशी यांना कर्णावती (गुजरात) येथून अटक केली. अपहृत बालकाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी बालकाची आई पूजा दास यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.
पूजा दास या नातेवाइकांसमवेत झारखंडला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकात आल्या होत्या. रेल्वे स्थानकाच्या आवारात आरोपी महंमद आणि नजमा यांनी पूजाशी ओळख केली. त्यांना बोलण्यात गुंतवून पूजाकडून बालकाला जवळ घेतले. कुणाचे लक्ष नसल्याची संधी साधून दोघांनी तेथून पलायन केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी तातडीने अन्वेषणास प्रारंभ केला. तांत्रिक अन्वेषणातून ते कर्णावती येथील उनावा परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली. तेथून त्यांना कह्यात घेण्यात आले.
संपादकीय भूमिकागुन्हेगारी क्षेत्रांत धर्मांध महिलाही धर्मांध पुरुषांप्रमाणे आघाडीवर ! |