दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथे शिवप्रेमींनी अवमान करणार्या व्यापार्यांच्या तोंडाला काळे फासले !
|
दापोली – येथील काही व्यापारी समुद्रावर फिरण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होईल, असे गाणे गात नृत्य केले. या गाण्याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर येथील संतप्त शिवप्रेमींनी संबंधित व्यापार्यांना केळसकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बोलावून खडसावले. त्यानंतर शिवप्रेमींनी त्यांच्या तोंडाला काळे फासले आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर क्षमा मागायला भाग पाडले.
शिवप्रेमींच्या मागणीनुसार संबंधित व्यापार्यांनी पोलिसांकडेही क्षमापत्र लिहून दिले. शिवप्रेमींनीही अवमान करणार्या व्यापार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
व्यापार्यांनी दिले क्षमापत्र
क्षमापत्रात म्हटले आहे की, सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचा उल्लेख गाण्यामधून आमच्याकडून केला गेला. तो होता कामा नये; पण आमच्याकडून ही चूक झाली आहे. गाणी, भारूड, पोवाडा म्हणत असतांना आमच्याकडून ही चूक झाली आहे, याची खंत आम्हाला आहे. महाराजांना आदर्श मानत आम्ही लहानाचे मोठे झालो. महाराजांविषयी आदर आधीही होता, आजही आहे आणि सदैव राहील. झालेल्या चुकीची आम्ही जाहीर क्षमा मागतो.
संपादकीय भूमिकाअवमान करणार्यांना क्षमा मागायला लावण्यासह छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान जागोजागी करण्यासाठी भाग पाडायला हवे ! |