Jharkhand Railway Track Blast : झारखंडमध्‍ये रेल्‍वे रुळ बाँबस्‍फोट करून उडवले !

कानपूरमध्‍ये रेल्‍वे रुळावर पुन्‍हा सापडले सिलिंडर

बाँबस्‍फोट करून उडवलेले रेल्‍वे रुळ

साहिबगंज (झारखंड) – उत्तरप्रदेशाच्‍या कानपूरमध्‍ये रेल्‍वे रुळावर अग्‍नीशामक सिलिंडर ठेवलेला आढळून आला. त्‍याच वेळी झारखंडमधील साहिबगंज येथील रेल्‍वे रुळ बाँबस्‍फोटाद्वारे उडवण्‍यात आला. दोन्‍ही घटनांचे अन्‍वेषण पोलीस करत आहेत. यापूर्वी २२ सप्‍टेंबर या दिवशी कानपूरमध्‍येच रेल्‍वे रुळावर एक गॅस सिलिंडर सापडला होता. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्‍यात आलेली नाही.

१. कानपूर येथे २ ऑक्‍टोबरला सकाळी ८ च्‍या सुमारास एक मालगाडी अंबियापूरजवळून जात होती. तेव्‍हा लोको पायलटला (चालकाला) हावडा-देहली मार्गावर अग्‍नीशामक यंत्र पडलेले दिसले.

२. मालगाडीच्‍या चालकाने गाडी थांबवून नियंत्रण कक्षाला माहिती दिली. रेल्‍वे पोलिसांचे पथक तातडीने घटनास्‍थळी पोचले आणि अन्‍वेषण चालू केले. सापडलेले आग विझवण्‍याचे यंत्र बरेच जुने आहे. पोलिसांनी प्रथमदर्शनी हा कुणाचा तरी खोडसाळपणा मानला. (भारतभरात अशा घटना घडत असतांना ‘खोडसाळपणा’ समजून हे सूत्र पोलिसांनी सोडून देऊ नये. हा रेल्‍वे जिहाद असून त्‍याच दृष्‍टीने पोलिसांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे ! – संपादक)

३. झारखंडमधील साहिबगंजमधील रांगा गावाजवळील रेल्‍वे रुळ १ ऑक्‍टोबरच्‍या रात्री बाँबस्‍फोटाद्वारे उडवून लावण्‍यात आला. या शक्‍तीशाली स्‍फोटामुळे रेल्‍वे रुळाचा ४७० सेंटीमीटरचा तुकडा ३९ मीटर अंतरावर पडला आहे. ज्‍या ठिकाणी स्‍फोट झाला, तेथे ३ फूट खोल खड्डा पडला.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारच्‍या घटना देशात एका पाठोपाठ घडत असतांना ‘हा रेल्‍वे जिहाद आहे का ?‘, याचा शोध अन्‍वेषण यंत्रणांनी आतापर्यंत घेतला पाहिजे होता. हे जर थांबवले गेले नाही, तर मोठी हानी होणार, हे निश्‍चित !