Pandit Dhirendra Krishna Shastri : ‘वासनेचे पुजारी’ असाच शब्‍दप्रयोग का ? वासनेचे पाद्री किंवा मौलाना असे का नाही? –  पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री  

(मौलाना म्‍हणजे इस्‍लामचा अभ्‍यासक)

बागेश्‍वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री

छतरपूर (मध्‍यप्रदेश) – बागेश्‍वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांनी  ‘वासनेचे पुजारी’, असे का म्‍हटले जाते ? वासनेचे पाद्री किंवा मौलाना असे का म्‍हटले जात नाही ?’ असे विधान केले आहे. या विधानानंतर त्‍यांच्‍यावर काही निधर्मीवाद्यांनी टीका केली होती.

पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री म्‍हणाले की,

१. सनातन धर्मात पुजारी हे पद अत्‍यंत महत्त्वाचे आहे. त्‍यांना ‘वासनेचे पुजारी’ असे रंगवून लक्ष्य केले जात आहे.

२. हिंदू त्‍यांच्‍या धर्मातील रितीरिवाजांची खिल्ली उडवतात; मात्र अन्‍य धर्मीय असे कधी करतांना दिसत नाहीत. ‘मुसलमान कधी त्‍यांच्‍या मौलवींचा अवमान करत नाहीत. हिंदू मात्र संत आणि तीर्थक्षेत्र यांचा अवमान करतात.

३. बरेचसे हिंदू हिंदु धर्मातील धर्मगुरूंकडून चालवण्‍यात येणारे संप्रदाय किंवा मंदिरे यांना ‘पाखंड्यांची दुकाने’ म्‍हणून हिणवतात.

४. आपल्‍या धर्मात सांगितलेल्‍या परंपरांना आपण पालन केले पाहिजे. या परंपराच आपली ओळख आहे. त्‍यांचे संवर्धन करणे, हे आपले दायित्‍व आहे.

५. मी कोणत्‍याही धर्माला उद्देशून काहीही म्‍हटलेले नाही. ‘वासनेचे मौलवी असे का म्‍हटले जात नाही’, असा प्रश्‍न विचारल्‍यावर एका मौलवीने आक्षेप घेतला होता. तेव्‍हा मी त्‍यांना प्रत्‍युत्तर दिले होते. सगळेच पुजारी चुकीचे नसतात. मग सगळ्‍यांनाच का लक्ष्य केले जाते ?

धीरेंद्र शास्‍त्री यांनी राबवली स्‍वच्‍छता मोहीम !

छतरपूरमध्‍ये सर्वपित्री अमावस्‍येच्‍या मुहूर्तावर सिद्ध क्षेत्र बागेश्‍वर धाममध्‍ये स्‍वच्‍छता मोहीम राबवण्‍यात आली. या अभियानाच्‍या अंतर्गत संपूर्ण परिसराची स्‍वच्‍छता करतांना स्‍वच्‍छ राहिल्‍यास आजारी पडणार नाही, असा संदेश देण्‍यात आला. पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांनी हातात झाडू घेऊन स्‍वच्‍छता मोहिमेला प्रारंभ केला.

संपादकीय भूमिका

भारतात चित्रपट, प्रसारमाध्‍यमे, तसेच अन्‍य माध्‍यमांद्वारे हिंदूंचे संत, महंत, धर्मगुुरु आणि पुजारी यांच्‍यावर खालच्‍या थराला जाऊन टीका केली जाते. याउलट अनेक वासनांध कृत्‍यात अडकलेले मौलाना किंवा पाद्री यांच्‍याविषयी काहीही बोलले जात नाही. हिंदूंच्‍या संतांचा अवमान थांबवण्‍यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्‍यक !