पुणे येथील बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळून ३ जणांचा मृत्यू
पुणे – येथील बावधन परिसरामध्ये सकाळी ६.४५ वाजता हेलिकॉप्टर कोसळले. त्यामध्ये गिरीशकुमार पिल्लाई, प्रीतमचंद भरद्वाज आणि परमजीत यांचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू येथील ‘ऑक्सफोर्ड गोल्फ कोर्स रिसॉर्ट’ येथे जात होते. बावधन परिसरात धुके असल्याने ते बराच वेळ आकाशामध्ये घिरट्या घालून शेवटी ते खाली कोसळले. या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोचले, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे हे १ ऑक्टोबर या दिवशी पुण्याहून परळीला गेले होते. त्यानंतर ते मुंबईला आले होते. त्यानंतर ते २ ऑक्टोबर या दिवशी मुंबईहून पुण्याला येणार होते. त्यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर जाणार होते, असेही सांगितली जात आहे.