अश्लील व्हिडिओ पाठवून हिंदु विद्यार्थिनीला छळणार्या महंमद शाकीब याला अटक !
कर्नाटकात ‘लव्ह जिहाद’चे आणखी प्रकरण उजेडात
मंगळुरू (कर्नाटक) – शहरात शिक्षण घेत असलेल्या कृष्णापूरजवळील एका हिंदु विद्यार्थिनीला भ्रमणभाषवर अश्लील चित्रे आणि व्हिडिओ पाठवून सतावणार्या महंमद शाकीब नावाच्या मुसलमान तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
१. उळ्ळालजवळील मंझनाडी येथील रहिवासी असलेला महंमद शाकीब हा धर्मांध मंगळुरूमध्ये शिक्षण घेत असलेल्या पीडित विद्यार्थिनीला वारंवार व्हॉट्स अॅपवर ‘हवी तेवढी रक्कम देऊ शकतो, येत जा’, अशा आशयाचे अश्लील मॅसेज पाठवून त्रास देत होता.
२. वासनांध शाकीब याच्या या त्रासामुळे विद्यार्थिनी तणावात होती. या संदर्भात विद्यार्थिनीच्या पालकांनी सुरतकल पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. ३. वासनांध तरुण बेंगळुरूमधील एका खासगी आस्थापनात काम करत होता. त्याला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
Muhammad Shakeeb arrested for harassing a Hindu student by sending obscene videos!
Another case of ‘Love J!had’ surfaces in Mangaluru, Karnataka
👉 It wouldn’t be surprising if cases of ‘Love J!had’ continue to rise as long as the #Congress party is in power in Karnataka.
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 3, 2024
संपादकीय भूमिकाकर्नाटकात काँग्रेस सत्तेत असेपर्यंत लव्ह जिहादची प्रकरणे वाढल्यास आश्चर्य वाटणार नाही. ही प्रकरणे रोखण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन आवश्यक ! |