नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मंदिर, रस्ते स्वच्छ ठेवा ! – राहुल रोकडे, अतिरिक्त आयुक्त, कोल्हापूर

आयुक्त कार्यालयातील बैठकीत बोलतांना (मध्यभागी) अतिरिक्त आयुक्त

कोल्हापूर – नवरात्रोत्सव, शाही दसरा यांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांची आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन स्वच्छतेचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी शाही दसरा, ललितापंचमी, पालखीमार्ग, श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर दैनंदिन स्वच्छता करणे, टाकाळा खण येथे स्वच्छता करणे या विषयीच्या सूचना सर्व आरोग्य निरीक्षकांना दिल्या. उत्सवकाळात जे वाहनतळ परिसर आहेत, ते दैनंदिन स्वच्छ ठेवावेत. श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात स्वच्छतेसाठी ३ सत्रांत स्वच्छता कर्मचारी ठेवा. या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी कचराकोंडाळे ठेवणे, अशा सूचना मुख्य आरोग्य निरीक्षक यांना दिल्या.