श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या चैतन्यमयी सत्संगात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त असलेल्या एका सत्संगात सहभागी होण्याची संधी मला गुरुकृपेने लाभली. आरंभी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना प्रार्थना करायला सांगितली. त्यानंतर त्यांनी साधकांना डोळे बंद करून वातावरणातील पालट अनुभवायला सांगितले. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. ‘माझे मन झोके घेतल्याप्रमाणे झुलत आहे’, असे मला वाटत होते. नंतर काही वेळाने माझे मन पूर्णपणे एकाग्र झाले.

२. डोळे बंद केल्यावर डोळ्यांसमोर सहन न होणारा पांढरा प्रकाश दिसणे

मी डोळे बंद केल्यावर माझ्या डोळ्यांसमोर पांढर्‍या रंगाचा प्रकाश येत होता. हळूहळू तो प्रकाश पिवळसर होऊन गडद होऊ लागला. काही क्षणांनी माझ्या मिटलेल्या डोळ्यांसमोर पुन्हा शुभ्र प्रकाश आला. हा प्रकाश माझ्या डोळ्यांना सहन होत नव्हता.

कु. प्रणिता भोर
कु. प्रणिता भोर

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन झाल्यावर मनात कृतज्ञताभाव दाटून येणे

आम्हाला डोळे उघडायला सांगितल्यावर आम्हाला दिसले, ‘समोरील व्यासपिठावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले), श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आसनस्थ आहेत.’ सनातनच्या तीनही गुरूंचे एकत्रित दर्शन झाल्याने माझ्या मनात कृतज्ञताभाव दाटून आला. सत्संगात माझ्या डोळ्यांमधून पूर्णवेळ भावाश्रू येत होते. सत्संगात मी डोळे बंद केले की, माझ्या डोळ्यांसमोर मला सहन न होणारा प्रकाश येत होता. सत्संगात ‘पुष्कळ प्रमाणात चैतन्य कार्यरत झाले आहे !’, हे अनुभवता येत होते.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्यांची कांतीही पूर्ण गुलाबी झाली असल्याचे दिसत होते.

५. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ एकमेकींमध्ये अनुभवत असलेले गुरुरूप

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना त्यांचा साधनाप्रवास जाणून घेण्यासाठी जिज्ञासेने प्रश्न विचारत होत्या. तेव्हा प्रत्येक वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा भाव जागृत होत होता. नंतर त्या दोघी एकमेकींच्या पाया पडल्या. तेव्हा ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या या दोघी एकमेकींत कशा प्रकारे गुरुरूप अनुभवतात !’, हे मला अनुभवता आले.

‘गुरुकृपेने मला या सत्संगाला बसण्याची संधी लाभली’, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ त्यांचा प्रत्येक श्वास आणि क्षण गुरूंसाठी समर्पित करण्यासाठी जशा कार्यरत असतात, त्याप्रमाणे मलाही झोकून देऊन, तळमळीने सेवा आणि साधनेचे प्रयत्न करता येऊ देत’, अशी गुरुचरणी प्रार्थना आहे.’

-कु. प्रणिता भोर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१२.२०२२)

या लेखात/ कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक