सोलापूर येथील शाळा आणि महाविद्यालये येथे मुसलमानांकडून इस्लामच्या प्रचारासाठी राबवली जात आहे धडक मोहीम !

सोलापूर – ‘स्टुडन्टस इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेकडून येथील शाळांमध्ये इस्लामचा प्रसार करण्याची धडक मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत सोलापूर येथील शाळांमध्ये ‘पवित्र कुराण काय आहे ?’, ‘कुराणचे महत्त्व’,  ‘कुराण मानवतेसाठी मार्गदर्शक’ या विषयांवर मार्गदर्शन चालू असून मराठीमध्ये कुराणच्या प्रती वाटण्यात येत आहेत. २१ सप्टेंबरपासून चालू झालेली ही मोहीम ५ ऑक्टोबरपर्यंत चालू रहाणार आहे. यात शाळा आणि महाविद्यालये येथे व्याख्याने होत असून यात समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी होत आहेत.

‘इस्लाम आणि कुराण हे मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे’, असे ‘स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेचे अध्यक्ष खान यांनी या मोहिमेची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

संपादकीय भूमिका

  • ‘गीता शाळेत शिकवणार’, असे म्हटल्यावर शिक्षणाचे भगवेकरण झाल्याची आरोळी ठोकणारे निधर्मी आणि साम्यवादी आता कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत ? एकाही प्रसारमाध्यमातून या शिक्षणाच्या हिरवेकरणाचे वृत्त दिले जात नाही, हे लक्षात घ्या !
  • हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान वाढवल्यास कुणीही त्यांचे धर्मांतर करू धजावणार नाही !