संत गहिनीनाथांच्या समाधीवर अतिक्रमण करण्याचा जिहाद्यांचा प्रयत्न सतर्क हिंदूंनी उधळला !
शेंदुर्णी (जळगाव) येथील घटना !
शेंदुर्णी (जळगाव) – येथील छत्रपती शिवाजीनगर भागातील संत गहिनीनाथ यांची गेल्या १०० वर्षांपासून समाधी आहे. समाधीस्थळाच्या समोर घरे, दुकाने आणि हॉटेल झाल्यामुळे समाधीमंदिर दुर्लक्षित झाले होते. गेल्या ३ – ४ दिवसांत तिथे काही मुसलमान तरुणांनी येऊन समाधीवर हिरवी चादर चढवली, तसेच नमाजपठण चालू केले. नंतर ते तेथे भिंत बांधत असल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक हिंदूंनी त्यांना विरोध केला. ३० सप्टेंबर या दिवशी हिंदु महिला आणि तरुण यांनी त्यांना या प्रकरणी खडसावले, तेव्हा त्यांनी काही उत्तर न देता तेथून पळ काढला. १ ऑक्टोबर या दिवशी पुन्हा एका मुलाने तेथे येऊन सांगितले, ‘येथील पीर माझ्या स्वप्नात आला होता. त्याने मला हे करण्यास सांगितले.’ स्थानिक हिंदूंनी अतिक्रमण काढून तिथे पुन्हा भगवे झेंडे आणि दिवे लावले. घटनेतील आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. स्थानिक हिंदु श्री. सतीश कागणे यांनी ही माहिती दिली.
Vigilant Hindus thwart j!h@d!s attempt to encroach upon the samadhi of Saint Gahininath in Sendurni (Jalgaon).
👉 Praiseworthy efforts by Hindus.
👉 If Hindus all over were as cautious and vigilant, no one would dare to encroach upon the sacred places of Hindus.… pic.twitter.com/vYYtwJvVwT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 3, 2024
संपादकीय भूमिकाधर्मरक्षणासाठी सतर्क असणार्या हिंदूंचे अभिनंदन ! हिंदूंनी सर्वत्र अशी सतर्कता दाखवली, तर हिंदूंच्या धार्मिक ठिकाणी कुणी अतिक्रमण करू धजावणार नाही ! |