Madras HC On RSS Pathasanchalan : रा.स्व. संघाला राज्यात पथसंचलनाला अनुमती द्या
|
चेन्नई – दसर्याच्या निमित्ताने होणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला तमिळनाडू पोलिसांनी अनुमती द्यावी, असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या पथसंचलनाला तमिळनाडू सरकारने अनुमती नाकारली होती. त्यानंतर या निर्णयाच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच यासंदर्भात निकाल दिला आहे. या वेळी न्यायालयाने तमिळनाडू पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
🚩Madras High Court : Allow the RSS to hold a march in the state
📌The Tamil Nadu government had earlier denied permission
👉The court also emphasized the need for action against the police of the anti-Hindu DMK government that denied permission#MadrasHighCourt#RSS #DMK… pic.twitter.com/A1N3VlnM0u
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 2, 2024
१. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम असतो, तेव्हा त्या कार्यक्रमाला अनुमती दिली जाते; मात्र विरोधी पक्षाचा कार्यक्रम असला की, त्याला अनुमती दिली जात नाही. हे एक गंभीर सूत्र आहे.
२. सार्वजनिक कार्यक्रमाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्या मार्गरदर्शक तत्त्वानुसार राज्य सरकारने या पथसंचलनाला अनुमती द्यायला हवी, त्यात कोणतीही अतिरिक्त अट घालू नये, असे न्यायमूर्ती जी. जयाचंद्रन् यांनी म्हटले आहे.
३. पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला अनुमती दिली नाही, तर हा उच्च न्यायालयाचा अपमान समजण्यात येईल, असेही न्यायमूर्ती जी. जयाचंद्रन यांनी स्पष्ट केले आहे.
संपादकीय भूमिकाअसे करण्यासह न्यायालयाने अनुमती नाकारणार्या हिंदुद्वेक्ष द्रमुक सरकारच्या पोलिसांवरही कारवाई करणे आवश्यक ! |